कुडाळ /-

तत्कालीन पालकमंत्री आ.दीपक केसरकर व विद्यमान पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून कुडाळ तालुक्यात २३ व मालवण तालुक्यात १२ तलाठी सझांची व दोन्ही तालुक्यात मिळून ६ महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. कुडाळ मालवण तालुक्यांची भोगोलिक परिस्थिती ,७/१२ ची संख्या, लोकसंख्या,महसुली गावातील वाड्यांची संख्या विचारात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता निश्चित केलेल्या नियमांचा विचार करून तलाठी सझांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गातील विखुरलेली भौगोलिक स्थिती त्यातच अनेक गावासाठी एक तलाठी सझा असल्याने सातबारा ,दस्त, व इतर कामासाठी लोकांची हेळसांड होत होती. तसेच एका तलाठी सझावर अनेक गाव अवलंबून असल्याने तलाठ्यांवरही कामाचा ताण होत आहे. त्यामुळे लोकांची कामे होण्यास विलंब होत होता. हि बाब लक्षात घेऊन आमदार वैभव नाईक यांनी नवीन तलाठी सझा , नवीन महसूल मंडळे होण्यासाठी पालकमंत्री ,खासदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यानुसार मालवण तालुक्यामध्ये सुकळवाढ, चौके, चाफेखोल, खोटले, बेलाची वाडी, असगणी, आडवली, बुधवळे, पळसंब, आचरा गाऊडवाडी, सडेवाडी, किर्लोस आणि कुडाळ तालुक्यात वर्दे , रानबांबुळी , गुढीपुर, बांबर्डे तर्फे माणगाव, आंबडपाल, पणदूर, आकेरी, घाटकर नगर, जांभरमळा, गोवेरी, हुमरमाळा, मानकादेवी, सोनवडे त कळसुली, आवळेगाव, तुळसुली क नारुर, कट्टागाव, केरवडे क नारुर, नमसगाव, शिवापूर, कुंदे, देऊळवाडी, कुपवडे, खुटवळवाडी या गावांमध्ये तलाठी सझांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

तसेच ओरोस बुद्रुक, गोठोस, झाराप, मडगाव, सुकळवाड, कोळंब या ठिकाणी नवीन महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांना आता सातबारा व इतर कामासाठी सोयीचे होणार आहे. तसेच तलाठयांवरील ताणही कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page