✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

समस्त वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत रात्रौ ७ ते ९ या वेळेत रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.दि. २८ फेब्रुवारी व दि. १ मार्च रोजी झी टॉकीज फेम युवा किर्तनकार ह.भ.प. संकेत महाराज यादव (फलटण) यांचे तर २ मार्च रोजी ह. भ. प. सुनिलजी महाराज मिरढेकर यांचे वारकरी कीर्तन होणार आहे. फलटण येथील ज्ञानकुर वारकरी शिक्षण संस्थेचे मृदंगाचार्य व गायनाचार्य हे कीर्तनाला साथ करणार आहेत. तरी श्रोत्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page