नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली आपल्या वाॅर्ड मद्धे व कुडाळ शहरातील पत्रकारांना करणार वेपोराझर मशीनचे वाटप..

नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली आपल्या वाॅर्ड मद्धे व कुडाळ शहरातील पत्रकारांना करणार वेपोराझर मशीनचे वाटप..

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली २ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनाचे औचित्त साधत
शुक्रवारी आपल्या भैरववाडी , पानबाजार या वाॅर्ड मध्ये वेपोराझर मशीनचे (वाफ घेण्याचे मशीन) वाटप करणार आहेत.हे वाटप प्रत्येक घरात एक याप्रमाणे नगराध्यक्ष ओंकार तेली हे वेपोराझर मशीनचे वाटप करणार आहेत.आपल्या वॉर्ड मधील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी पोटी हे वाटप करणार आहेत.तसेच कुडाळ शहरातील पत्रकार जे कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता पत्रकारिता करत समाजातील प्रत्येक घडामोडी हे लोकांपर्यंत पोचवत असतात त्यांना पण सुरक्षाच्या दृष्टीने या मशिंचे वाटप करणार आहे.असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे.

अभिप्राय द्या..