संजय गांधी पेंशन योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने पेन्शनची रक्कम मिळाली नाही.;त्वरित कार्यवाही व्हावी बाळू अंधारी

संजय गांधी पेंशन योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने पेन्शनची रक्कम मिळाली नाही.;त्वरित कार्यवाही व्हावी बाळू अंधारी

मालवण / –

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची सिंधुदुर्ग जिल्हयात आठही तालुक्यात जवळ जवळ ४०० हुन अधिक प्रकरण मंजूर होऊन अनुदानाच्या प्रतीक्षेत असून तात्काळ या प्रकरणांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात यावे

कोरोना संसर्ग मुळे गेले ६ महीने जिल्ह्यातील बस व इतर वाहतूक तसेच व्यवहार ठप्प होती अश्यातच ग्रामीण भागातील नागरिकांनी या बंद काळात अत्यंत हालकीत दिवस काढले असून जेष्ठ नागरिकांना, तसेच संजय गांधी लाभार्थी महिला वर्गाला काहीशा प्रमाणात का असेना या पेन्शन मुळे घर चालवण्यासाठी हातभार लागला असता परंतु गेल्या ३ महिन्यात पेन्शन न मिळाल्याने तसेच कोरोना मुळे यंदा सुरू झालेल्या बस प्रवासात भाडे देखील वाढल्याने व वाहतूक कमी असल्याने तहसीलदार कार्यालयात येणं जाणं देखील परवडणारे नसून वारंवार पेन्शन बाबत विचारणा करण्यास या कार्यालयात जाणं देखील कोरोना संसर्गा मुळे शक्य नाही.

तसेच याही योजना प्रत्येक लाभार्थ्यांना तळागाळातील गरजूंना मिळावी यासाठी सरकार तत्पर असून अधिकारी वर्ग मात्र याबाबत काहीसे उदासीन असल्याचे दिसून येत असते
आपण त्वरित याची दखल घेऊन या लाभार्थीना पेन्शन त्यांच्या खात्यात भरणा करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ओरोस येथील मुख्यालयात सामान्य न्याय प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सौ. रोहिणी रजपूत यांस निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे सचिव श्री. महेश उर्फ बाळू अंधारी यांनी केली आहे यावेळी जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, योगेश्वर कुरले, पल्लवी तारी, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..