कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सी. आर. झेड. जनसुनावणी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित गावातील सर्व जनतेने व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले आहे.
ही जनसुनावणी उद्या सोमवार दिनांक २८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. या अगोदर ज्या ग्रामपंचायती, संस्था किंवा नागरिकांनी आपल्या लेखी हरकती नोंदवलेल्या आहेत त्यांनी देखील या सुनावणीमध्ये सहभागी होऊन आपल्या हरकती सविस्तरपणे नोंदवाव्यात. ज्या ठिकाणी मोबाईलचे नेटवर्क नाही अशा गावातील व्यक्तींनी जिल्हा नियोजन समिती सभागृह तसेच त्या या तालुक्यांच्या पंचायत समितीमध्ये उपस्थित राहून तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नेटवर्क चा आधार घेऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात.