कुडाळ /-

पावशी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी पंचायत समिती कुडाळ, मा.उपसभापती श्री.जयभारत पालव, पावशी सरपंच मा.श्री.बाळा कोरगांवकर,उपसरपंच मा.श्री.आंगणे, मा. प्र. गटविकास अधिकारी श्री. एम. बी.भोई इत्यादी मान्यवर उपस्थित होते, यावेळी कुुटुंबाच्या भेटी घेऊन संवाद साधण्यात आला, आरोग्य सहाय्यक प्रकाश तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे उद्देश व उपयोगीता पटवून दिली, कोव्हिड१९ समज गैरसमज, वैज्ञानिक माहिती, घ्यायची काळजी,यावर मार्गदर्शन करण्यात आले, कोव्हिड पूर्व, कोव्हिड,आणि कोव्हिड नंतर काय काळजी घ्यावी याबद्दलही विस्तृत माहिती देण्यात आली.यावेळी कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करताना, SpO2, ताप, व लक्षणे तपासण्यात आली, कुटुंबीयांनी चांगले सहकार्य केले.

“कोरोनाची संसर्गाची साखळी आपल्याला तोडायची असेल तर प्रत्येकाने आरोग्यदायी नियम पाळणे अत्यंत गरजे आहे, आपण सर्वांनी नियम पाळून सुरक्षीत राहूया, प्रशासनाला साथ करा” असे आवाहन मा उपसभापती जयभारत पालव यांनी केले.
“कोरोना संपविण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने जबाबदारी पार पाडुया तरच हा आजार संपेल” असे आवाहन प्र. गटविकास अधिकारी श्री.एम.बी.भोई यांनी केले.

मान्यवरांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच ग्राम दक्षता समिती कोव्हिड १९ यांच्या कामाचे कौतुक केले, व समाधान व्यक्त केले, तसेच सर्व आरोग्य कर्मचारी यांचेही कौतुक करुन स्वतःचीही काळजी घेण्याबद्दल सूचविले. यावेळी मा सरपंच यांनीही आरोग्य कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत, चांगली सेवा देत आहेत असे सांगून त्यांचा गौरव केला.
यावेळी आरोग्य सहाय्यक ता.आ.कार्यालय कुडाळ श्री.तेली, आरोग्य सहाय्यक प्रकाश तेंडोलकर, वाय.एन.रणशूर. यशवंत गावडे, श्रीम.आर.व्ही.टेमकर, श्रीम.एम.बी. नेरुरकर, व ग्रामविस्तार अधिकारी श्रीम.सरिता धामापूरकर व आशा स्वयंसेविका हजर होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page