वेंगुर्ला /-

कलावलय वेंगुर्लेने वेंगुर्लासारख्या ग्रामीण भागात सलग २६ वर्षे एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाकारांना घडविण्याचे काम केलेले आहे. स्पर्धा भरविणे हे किती कठीण असते. हे मला जेष्ठ नाट्यकर्मी असल्याने माहिती आहे. या स्पर्धांना मुंबई, सोलापूर, सांगली, डोंबिवली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील कलाकारांनी सहभाग घेत आपली कला वृद्धींगत करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कलेस रसिका श्रोत्यांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. कारण वर्षभरातून राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा एकदाच होतात व संपूर्ण वर्षभर नवीन कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत नाही. एकांकीका स्पर्धा या कलाकारां आ घडविण्याचे काम करतात. त्यामुळे कलावलय वेंगुर्ला संस्थेचा कलाकारांना घडविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून योगदान आहे. असे प्रतिपादन गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी देवीदास आमोणकर यांनी वेंगुर्लेत प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यसभागृहात आयोजित केलेल्या प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उदघाटन गोव्यातील जेष्ठ नाट्यकर्मी देवीदास आमोणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांत कलाव संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, या उद्घाटन कार्यक्रमाचे अ‍ नगरपरिषदेचे परीतोष कंकाळ, परीक्षक ज्ञानेश मुळे, रविदर्शन कुलक सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप ,स्विटी परनाळकर यांचा समावेश होता.

या स्पर्धेसाठी उपस्थित अन्य मान्यवरातं संतसाहित्याचे गाढे अभ्यासक अॅड. देवदत्त परूळेकर, मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, कलावलय वेंगुर्लेचे उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनित रेडकर, पॉवर लिफ्टर अनुजा तेंडोलकर, कलावलय वेंगुर्लेचे दाजी परब, दिनेश तानावडे प्रदीप कुबल, विनोद वरसकर, भाई वायंगणकर, बापू वेंगुर्लेकर, चतुर पार्सेकर, प्रसाद जोशी, तरुण भारतचे उपसंपादक महेंद्र मातोंडकर, तसेच पंकज शिरसाट, भानुदास मांजरेकर, लोकेश शिरसाट, जितेंद्र वजराटकर याचा समावेश होता. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरानी कलावलय वेंगुर्ले संस्थेने तरूण नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सलग २६वर्षे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल गोरोवोद्वार काढते..

कलावतय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर यांच्या हस्ते गोव्यातील जेष्ठ नाटयकर्मी देवीदास आमोणकर, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी पारतोष कंकाळ, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, परीक्षक ज्ञानेश मुळे, रविकिरण कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्विटी यरनाळकर यांचा शाल, श्रीफळ, शाल व पुष्प असलेले रोपटे प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे पास्ताविक कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर यानी तर सुत्रचालन किरात साप्ताहिकच्या संपादिका सिमा मराठे यांनी केले.. फोटो ओळी स्व. प्रा. शशिकांत यस्नाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी देविदास आमोणकर यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page