लोकसंवाद /- ओरोस.

कसाल बाजारपेठेत भर वस्तीतील मोबाईल दुकान फोडून चोरट्याने सुमारे ३३ हजार ३०० रुपये हजारांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरून नेले असल्याचे उघड झाले आहे. ही चोरी शुक्रवारी मध्यरात्री 1:45 ते 2 या वेळेत झाली असून, चोरटा दुकानात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरीचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.

मुंबई गोवा महामार्गालगत कसाल या बाजारपेठेमध्ये विजय सुखदेव साठे यांचे कामाक्षी मोबाईल शॉपी असे दुकान आहे. काल शुक्रवार असल्याने हे दुकान श्री साठे हे दुपारी बंद करून घरी गेले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी दुकान उघडले असता या दुकानाचे छप्पर फोडून हे दुकान फोडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. त्यानंतर

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कामाक्षी मोबाईल शॉपी ही कसाल बाजारपेठेमध्ये भर वस्तीत आहे. असे असूनही शुक्रवारी रात्री 1:47 ते 2 या वेळेत या शॉपी मधून चोरी झाली असल्याचे या शॉपीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा वरून स्पष्ट झाले आहे. चोरट्याने या शॉपीचे छप्पर असलेला सिमेंट पत्रा फोडून त्याखाली असलेले सीलिंग फोडले आणि दुकानात प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्याने काउंटर मधील पैशाचे ड्रायव्हर खोलले मात्र त्यात त्याला काही सापडले नाही. त्यानंतर त्याने आजूबाजूला असलेले काही महागडे मोबाईल, हेडफोन आधी वस्तू ‍ गोळा केल्या आणि त्या एका कपड्यांमध्ये बांधून पुन्हा हा चोरटा आल्या मार्गाने वर चढून फरारी झाला.

या मोबाईल शॉपी मधून जियो कंपनीचे २ मोबाईल, आय टेल कंपनीचा १, लावा कंपनी १ मोबाईल असे एकूण चार मोबाईल तर स्मार्ट वॉच २, ब्लूटूथ ७, एअर बड३ असा एकूण ३३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरो गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page