कणकवली /-

कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद यश मिळविले आहे. एकूण 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व 14 जागा जिंकल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एकही जागा मिळू शकली नाही.

यात शेती संस्था मतदारसंघातून भाजपाचे सातही उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये किरण गावकर 27, सुरेश ढवळ 27, संजय शिरसाठ 27, अतुल दळवी 26, श्रीपत पाताडे 26, रघुनाथ राणे 26, प्रशांत सावंत 25 है विजयी झाले.पा इतर संस्था मतदारसंघातून भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीचे मिथील सावंत विजयी झाले त्यांना 18 पैकी 16 मते मिळाली.. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गा मतदारसंघातून भाजपाच्या विनिता बुचडे विजयी झाल्या.. इतर मागास प्रवर्गातून भाजपाचे सदानंद हळदीने विजयी झाले व्यक्तिमतदार संघातून भाजपाचे प्रकाश सावंत व गुरु प्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर विजयी झाले.

महिलाराखीव मधून भाजपच्या लीना परब व स्मिता पावसकर विजयी झाल्या या विजयानंतर भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यानी एकच जल्लोष करत आनंदउत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page