▪️पुढील कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणार- महासंघ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

लोकसंवाद /- वेंगुर्ला.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांस बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, महासंघाचे सन २०२३ चे कॅलेंडरचे अनावरण, भंडारी कुटुंब जनगणना तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार आदी भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमास देवगड येथील समाज बांधव दानशूर व्यक्तिमत्त्व नंदूशेठ घाटे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन नंदूशेठ घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच
नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुनिल आठवले यांच्या दवाखान्याच्या रंगमंचावर कॅलेंडरचे अनावरण व सरपंच – सदस्य सत्कार या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री. नंदूशेठ घाटे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर, कार्याध्यक्ष हेमंत करंगुटकर, देवगड तालुका अध्यक्ष मालवणकर, महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य, तसेच सदस्य मनोहर पालयेकर, विलास करंजेकर, प्रदिप मुणगेकर,राजू गवंडे, सौ. श्रेया गवंडे, निलेश गोवेकर, दिवाकर म्हावळणकर, मोहन गवंडे, विलास आसोलकर, सौ.
मनाली करंगुटकर, रविंद्र तळाशीलकर, उल्हास हळदणकर, शंकर पालयेकर, तसेच देवगड तालुका मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भरगच्च झालेल्या या कार्यक्रमास २०२३ च्या महासंघाचे कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले.

देवगड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच – सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

यावेळी मकरंद केशव शिंदे, श्रीकृष्ण अनंत अनुभवणे (दाभोळे), अमित अरुण फणसेकर (फणसे)
मनाली करंगुटकर, पूर्वा जाधव (पडवणे) यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत सदस्य जयवंत सिताराम मिठबावकर -सौंदाळे, प्रमिला विठ्ठल मुणगेकर – आरे, प्रतीक्षा प्रदीप मिठबावकर – विजयदुर्ग, दिनेश मधुकर जावकर – विजयदुर्ग, नेहा योगेश मयेकर- पोयरे, दिव्या दत्तात्रय रूमडे – दहिबाव, देवानंद अरुण खोत दहिबाव, किशोर श्रीकृष्ण दूधवडकर – दहिबाव, स्नेहा लक्ष्मीकांत नारिंग्रेकर- नारिंग्रे, मृणाली श्रीकांत गावकर – नारिंग्रे, मनाली महेश मयेकर – कट्टा, प्रतीक्षा प्रल्हाद शेडगे – कट्टा, स्वरा विराज करंगुटकर – कट्टा, गणेश वासुदेव करंगुटकर – कट्टा, तेजस्विनी रामानंद शेडगे – कट्टा, स्नेहल सूर्यकांत फणसेकर – फणसे, अनामिका अरुण फणशिकर – फणसे, आरती रुपेश मिठबावकर – किंजवडे, मनोहर एकनाथ मसूरकर – सांडवे, दीप्ती खोत – हिंदळे देवयानी देविदास वाडेकर, चारुशीला जाधव, मधुरा अजित करंगुटकर, प्रदीप परवार इत्यादींचा सत्कार करण्यात आला.

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा स प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिराचंद्र तानावडे, उपाध्यक्ष प्रवीण जोग, जिल्हा सदस्य उद्धव गोरे, जिल्हा सहसचिव रविकांत चांदोस्कर, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, तालुका सदस्य प्रसाद दुखंडे, अंकुश ठुकरुल, वैशाली गणेश कीर, गणेश कीर आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरा मध्ये डॉ. सुनिल भास्कर आठवले व त्यांच्या सर्व सहकार्यांनी सहकार्य केले.दोन्ही कार्यक्रम दानशूर व्यक्तिमत्व बाबू सावंत व नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या सौजन्याने करण्यात आले*. त्यानंतर महासंघाचा महत्त्वाचा कार्यक्रम कुटुंब जनगणना चा शुभारंभ ज्येष्ठ समाज बांधव प्रसाद मयेकर यांच्या घरी जाऊन महासंघ व मंडळाच्या उपस्थितीत यश फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास नंदूशेठ घाटे व महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रदिप मुणगेकर यांनी केले व विलास करंजेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page