लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज शुक्रवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी पुष्पहार अर्पण करून,उपस्थित पत्रकारांना श्री. खवणेकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष समिल जळवी,सहसचिव कृष्णा सावंत,सहखजिनदार संजय भाईप,जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर,युवा सेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी,मनसे पदाधिकारी सचिन सावंत,सामाजिक कार्यकर्ते नामदेव जानकर आदि पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page