✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

शहरात प्रथमच सर्व सामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “एस. एम. मडकईकर ज्वेलर्स” या १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूमचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या खास ऑफर्स ग्राहकांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. यावेळी तीन हजार रुपये किंमतीचे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, राणी हार, नेकलेस व काकणांचा सेट आदी दागिने ग्राहकांनी फक्त दोन हजार रुपयात खरेदी केले. दरम्यान ही ऑफर १८ डिसेंबर पर्यंत मर्यादित असून दागिने शौकिनांनी आमच्या दालनाला अवश्य भेट द्यावी, व कमी दरात दागिने खरेदी करण्याची संधी मिळवावी, असे आवाहन मडकईकर कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर, प्रियांका मडकईकर, राजेश पनवेलकर, गुरु मठकर, राजू कारेकर, उत्तम धारगळकर, दिपाली मडकईकर आदिंसह मोठ्या संख्येने मडकईकर कुटुंबीय व नातेवाईक तसेच परिसरातील सुवर्णकार उपस्थित होते.
सावंतवाडी उभा बाजार परिसरातील मारुती मंदिर समोर हे झालं सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी उद्घाटनानिमित्त विशेष ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. यात ३ हजारांच ‘मंगळसुत्र’ फक्त २००० रूपयांत, ३ हजारांचा ‘राणी हार’ १९०० रूपयांत, ‘नेकलेस सेट’ फक्त १६०० रूपयात‌, ६ काकणांचा सेट १९०० रुपयात आदी किमतीत दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा आज असंख्य ग्राहकांनी लाभ घेतला. तर ही ऑफर १८ डिसेंबर २०२२ पर्यंत मर्यादित असून जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक आमच्या दालनात भेट द्यावी किंवा विराग मडकईकर 8411930437 / वैष्णवी मडकईकर 7796695448 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page