✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
आज सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर मळगाव येथे दोन कारचा भीषण अपघात झाला.अपघातामध्ये किरकोळ जखमी वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दोन्ही कारची दर्शनी भागाची मोठी नूकसानी झाली.
या बाबत सर्व्हीस्तर व्रुत्त असे की एम. एच.14 एच.डब्ल्यु. 6439 ही अर्टीगा कार मुबंईहुन गोव्याला भरधाव वेगात जात असताना टायर फुटल्याने गोव्याहुन मुबंईला जाणार्या एम. एच.13 डी. वाय.3798 या कारला जोरदार धडक दिली अपघाताची भीषणता एवढी भयानक होती गोव्याहुन जाणार्या कार परत गोव्यादिशेला फीरली.मात्र या अपघातामध्ये सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.अपघात घडताच त्याठीकाणी कार्यरथ असलेले महामार्ग कसाल ( सिंधुदुर्ग ) पथकाचे सहा. पोलीस फौजदार प्रदिप पुजारी,सहा पोलीस फौजदार अनिलकुमार पवार,भुषण नाईक,प्रथमेश वानिवडेकर यांनी जखमीना मदत करत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.अपघातिची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.