✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सिंधुदुर्गात सुरू होणारी टोलधाड रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे,असा सूर आज येथे झालेल्या विविध पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.टोलविरोधी आंदोलनाची व्याप्ती वाढली पाहिजे.यासाठी या समितीत तरुणांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी जाहीर करण्यात आलेल्या अस्थायी समितीच्या अध्यक्षपदी सतीश लळीत यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर,माजी आमदार परशुराम उपरकर, कोल्हापूर टोलमुक्त समितीचे गिरीश फोंडे, जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष,श्रीराम शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, सतीश लळीत,एमआयडी असो.राजन नाईक, शिवाजी घोगळे, संजय भोगटे, पी. डी. शिरसाट, गिरीश फोंडे, संजय भोगटे, ईर्शाद शेख, हेमंत मराठे, तसेच जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page