कणकवली /

कोल्हापूर येथून ३० नोव्हेंबर २२ मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे सावंतवाडी आंबोली मार्गे सिंधुदुर्गात येणार आहेत.राज ठाकरे यांचे सावंतवाडी गवळी तिठा येथे स्वागत होणार आहे.त्यानंतर मळगाव मार्गे हायवे येथील आराध्य हॉटेल कुडाळ येथे राज ठाकरे यांचा मुक्काम होणार आहे,अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष दयानंद मेस्त्री उपस्थित होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे १ डिसेंबरला सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा कार्यकर्त्यांची १० वाजता बैठक होईल.कुडाळ तालुका ११ वाजता भव्य स्वागत,त्यानंतर मराठा मंडळ येथे बैठक होणार आहे.मालवण येथे भव्य स्वागत होईल,त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मालवण तालुका कार्यकर्त्यांची बैठक आणि मुक्काम मालवण येथे असणार आहे.२ डिसेंबरला राज ठाकरे सकाळी आगणेवाडी देवीचे दर्शन,तेथून कणकवली पटवर्धन चौक येथे कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर ११ वाजता मान्यवरांच्या गाठीभेटी,कणकवली विधानसभा कार्यकर्त्यांची दुपारी ३ वाजता बैठक,नागरिकांच्या गाठीभेटी व निवेदन स्वीकारणार आहेत,अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page