✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाले असून सिंधुदुर्गात भाजपा आणि बालसाहेबांची शिवसेना साथ साथ असणार आहे. ग्रा पं निवडणुक युतीबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह भाजपाचे महेश सारंग बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, अशोक दळवी, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समनव्ययक सुनील पारकर यांच्यात युतीबाबत यशस्वी चर्चा झाली. ठाकरे सेनेला तसेच विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना आता एकजुटीने लढा देताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page