✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

मळगाव येथील जत्रोत्सवाला दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीवरील युवक जखमी झाले. ओमकार बाळा राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत ( सर्व राहणार मळगाव ) अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर त्यांना उपचारार्थ सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी असल्याने यातील ओमकार याला गोवा बांबुळी येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास मळगाव बाजारपेठ येथे हा अपघात झाला.

यातील ओमकार राऊळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर गोवा बांबुळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर लवू राऊळ याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अक्षय भगत याची प्रकृती स्थिर असून त्याला घरी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page