वैभववाडी /-

सागाच्या झाडाखाली जुगार खेळणा-या दहा जणांना वैभववाडी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. कोळपे जमातवाडी येथे ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख २ हजार ९०० रुपये व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी २.३० वा. सुमारास करण्यात आली.

दहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभववाडी पोलिस रविवारी दुपारी गस्तीवर असताना कोळपे जमातवाडी येथे जुगार सुरु असल्याची माहीती मिळाली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली साध्या कपड्यावर पोलिसांचे पथक कोळपे जमातवाडी येथे गेले. त्याठिकाणी व्हाळाच्या बाजूला सागाच्या झाडाखाली पैसे लावून काही इसम जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. लागलीच पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून जुगार खेळणारे व त्यांच्या बाजूला उभे राहून बघणारे अशा एकूण अकरा जणांना शिताफीने ताब्यात घेऊन वैभववाडी पोलिस ठाणेत आणण्यात आले. यामध्ये कादीर इब्राहीम थोडगे वय ५०, हुसेन उमर लांजेकर ४१, नासीर कमरुद्दीन नंदकर वय ५३, युसुफ फकीर नंदकर ४६, खुदबुद्दीन महमद नंदकर, अलताफ शब्बीर नंदकर, हुसेन थोंडू नंदकर, रमजान सरदार नाचरेकर, दाऊद हसन नाचरेकर, सर्व रा. कोळपे जमातवाडी तसेच खुदबुद्दीन इब्राहीम पाटणकर रा. उंबर्डे मेहबुबनगर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख २ हजार ९०० रुपये मुद्देमाल व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पो. कॉ. अजय बिल्पे, पुंडलिक वानोळे, यांच्या पथकाने केली आहे. त्यामुळे उंबर्डे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page