लोकसंवाद /- दोडामार्ग

तिलारीत पर्यटनात्मक प्रकल्प उभे राहावे या मागणीसाठी तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात बैठक बोलावू,असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनही देण्यात आले.मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तिलारी वसाहतीतील खोल्या अशाच पडून आहेत. त्या ठिकाणी लघुउद्योग निर्मिती होऊ शकते.त्या दृष्टीने त्याचा वापर करण्याबाबत योग्य तो विचार विनिमय करावा. त्याचबरोबर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर तिलारीत सुद्धा उद्यान उभारण्यात यावे. हैदराबादच्या धरतीवर लेझर शो पार्क, म्हैसूरच्या धरतीवर गार्डन आदी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत, शिवाय तालुक्यातील कसईनाथ डोंगर, मांगेली धबधबा, विविध मंदिरे यांचाही विकास व्हावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page