वेंगुर्ला /-
सी.आर.झेड जनसुनावणी मध्ये कशा प्रकारे हरकत घ्यावयाची या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी सीआरझेड कन्सल्टंट अमित कामत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी म्हापण,केळूस, भोगवे,कोचरा, वायंगणी, दाभोली, इत्यादी ग्रामपंचायततीनी सहभाग घेतला होता. यावेळी सभापती अनुश्री कांबळी,गटविकास अधिकारी उमा पाटील, शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सचिन वालावलकर, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. लोकानी याबाबतीत समाधान व्यक्त केले व सदर प्लॅन आम्हाला समजला असून आता आम्ही हरकत योग्य प्रकारे घेऊ शकतो असे सांगितले.