दोडामार्ग /-
बांबर्डे-हेवाळे येथील शेतकऱ्यांचे वनखात्याविरोधात आज तिस-या दिवशी उपोषण सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पांठिबा दिला आहे.जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व कार्यकर्त्यांनी भेट घेत पाठिंबा दर्शविला.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी फोनद्वारे संपर्क साधत आपण आपल्या परीने या सर्व कामाची चौकशी करण्यास प्रयत्न करतो अन् आपणांस न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी आंदोलन स्थळी कृषी जिल्हासेल आचरेकर, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, व्ही.जी.एन.टि. तालुकाध्यक्ष संदेश वरक, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, प्रदीप चांदेलकर, अविनाश गवस, सुशांत राऊत,उल्हास नाईक आदी उपस्थित होते.