कुडाळ /-


कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या विविध शाखांचा निकाल नुकताच जाहीर झाला.मुंबई विद्यापीठाअंतर्गत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा निकाल १००% टक्के लागला. तर तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकाल 99% टक्के लागला. तसेच तृतीय वर्ष कला विभागाचा निकाल हा 97% लागला.


कला विभागात एकूण 46 मुलं परीक्षेला बसली त्यापैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य विभागामध्ये 112 विद्यार्थ्यांपैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच विज्ञान विभागातील 62 विद्यार्थी बसले होते व सर्व उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क.म.शि.प्र.मंडळाचे मा. श्री.भाईसाहेब तळेकर, मा. श्री.अनंत वैद्य, मा. श्री. सुरेश चव्हाण, मा. श्री. अरविंद शिरसाट, मा. श्री. का आ. सामंत सर सर आदी सर्व संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page