वेंगुर्ला /-

      वेंगुर्ले पोलिस स्टेशन मार्फत वेंगुर्ले पीआय अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले शहरात अंमली पदार्थ जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यावेळी स्वतः पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले.
वेंगुर्ले एस.टी. स्टँड येथे
वाहतूक पोलिस मनोज परुळेकर, महिला पोलिस संतोषी सावंत यांनी या मोहिमेबाबत प्रवासी, विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. तसेच येथील रिक्षा स्टँड येथेही मार्गदर्शन करण्यात आले.अंमली पदार्थ सेवनाने जीवन उध्वस्त होत आहे. मुलांनी तसेच इतरांनीही त्यापासून दूर रहावे.अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम पाहता त्याऐवजी योगासनांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.तसेच वेंगुर्ला हायस्कुल व पाटकर हायस्कुल आदी ठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी महिला पोलिस रंजिता चौहान, प्रज्ञा मराठे, मनोज परुळेकर, संतोषी सावंत आदी सहभागी झाले होते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page