You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली बागायतवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाकडून वाचविण्यात यश..

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली बागायतवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाकडून वाचविण्यात यश..

बिबटला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन आले यश..

वेंगुर्ला /-

आज दि १८ जून २०२२ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांना त्यांच्या विहीरी मध्ये वन्यप्राणी बिबट पडला असल्याचे दिसले असता त्यांनी तात्काळ त्याबाबत स्थानिक वनकर्मचा-यांना माहिती दिली असता, वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तत्परतेने घटनास्थळी दाखल होत २० ते २५ फूट खोल विहिरीतून वन्यप्राणी बिबट यास सुखरूप बाहेर काढले तत्पूर्वी कठडा नसलेल्या या विहिरीत ग्रामस्थांनी विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने पाण्यात फळी सोडल्याने त्या फळीचा आधार घेत बिबट त्यावर बसून राहिला.

भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आलेने कठडा नसलेल्या या विहिरीत वन्यप्राणी बिबट आत मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री.अमृत शिंदे यांनी लोकसंवाद लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.तर ते पुढे म्हणाले स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वन् प्राणी बिबटचा जीव वाचवता आला त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.

सदर वन्यप्राणी बिबटचे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री .दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, वनपाल मठ हरी लाड, वनपाल नेरूर धुळु कोळेकर, वनरक्षक मठ सूर्यकांत सावंत, वनरक्षक तुळस विष्णू नरळे, वनरक्षक नेरूर सावळा कांबळे यांनी स्पोलीस पाटील जनार्धन पेडणेकर व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.यावेळी पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर,सरपंच उदय गोवेकर,उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर,नित्यानंद शेणई,कृषी सहाय्यक सुनील टेमकर,ग्रामपंचायत सदस्य कमलेश करंगुटकर आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..