You are currently viewing सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग कार्यकारणी जाहीर.;अध्यक्ष पदी विवेकानंद नाईक तर सचिव पदी संतोष सातार्डेकर यांची निवड.

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग कार्यकारणी जाहीर.;अध्यक्ष पदी विवेकानंद नाईक तर सचिव पदी संतोष सातार्डेकर यांची निवड.

दोडामार्ग /-

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण गवस, सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या उपस्थितीत सुशिला हाँल, दोडामार्ग येथे बैठक पार पडली. त्यामुळे दोडामार्ग शाखेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. त्यात अध्यक्ष-विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष – जयवंत तुळसकर व सौ.गीतांजली संतोष सातार्डेकर, सचिव-संतोष सातार्डेकर, सहसचिव – वैभव रेडकर, खजिनदार-अजित देसाई, सहखजिनदार-रामचंद्र ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख -भूषण सावंत, संपर्क प्रमुख – अजित सावंत, महिला संघटक – सौ.डॉ. पूजा विराज नाईक, कार्यक्रम व्यवस्थापक- मनोज वझे व साईराज राणे, दशक्रोशी प्रमुख – गोविंद गवस व रामकृष्ण दळवी, तर सदस्य पदी – रजत प्रसादी यांची निवड करण्यात आली. यावेळी दोडामार्ग अध्यक्षपदी विवेकानंद नाईक यांची निवड झाल्याने जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण गवस, सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..