सिंधुदुर्ग /-

समाजासाठी काही करण्यासाठी मनात एक सहजप्रेरणाच असावी लागते. नाइलाजाने, इतर काय म्हणतील? म्हणून केलेलं कार्य अल्पायुषी ठरतं अनेकजण आपल्या कामातुन वेळ मिळत नसल्याची सबब पुढे करतात. मात्र दोडामार्ग च्या माजी आरोग्य सभापती अनिशा दळवी याला अपवाद ठरल्या आहेत.यांनी डायलेसिस रुग्ण सुनीता सावंत यांना जिल्हा रुग्णालय येथील वर्षानुवर्ष बंद असणार मशीन आपल्या प्रयत्नाने सुरु करुंन दिले .त्यामुळे आता सर्वच रुग्णाना त्याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. खरे तर सुनीता सावंत यांचे डायलेसिस पडवे च्या रुग्णालयात सुरु होते. परंतु सुनीता यांना काविळ झाल्याने पडवे हॉस्पिटल मधील उपचार तत्काळ थांबविण्यत आले .काविळ असताना डायलेसिस करणे शक्य न होते.खाजगी डॉक्टर सुनीता यांना परवडणारे न होते. जिल्हा रुग्णालयातिल काविळसाठी वापरली जाणारी डायलेसिस मशीन धुळ खात पडून होती. मात्र माजी आरोग्य सभपती अनिशा दळवी यांनी तत्कालळ आपल्या प्रयत्नाने बंद मशीन सुरु करू दिली आणि सुनीता सावंत यांना जिल्हा रुग्णालयात डायलेसिस चे उपचार कमी खर्चात घेणे सहज शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page