You are currently viewing गोठोस मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला पर्यावरण दिन.

गोठोस मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला पर्यावरण दिन.

कुडाळ /-

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन कुडाळ तालुक्यातील गोठोस गावामध्ये ५ जून २०२२ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गुरव यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. गिरीश उईके तसेच ग्रामसेवक श्री. गुरुनाथ गावडे, कृषी सहाय्यक श्री.धनंजय कदम, कृषी पर्यवेक्षक सौ. परब मॅडम व प्रगतशील शेतकरी श्री .विष्णू ताम्हाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुण पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी कु. विश्वेन्द्र गुप्ता,कु. कौस्तुभ भावे, कु. ओमकार सावंत,कु.अनिकेत देसाई, कु. शैतान सिंग मीना आणि कु. मनोज कुमार काला यांनी मेहनत घेतली.

अभिप्राय द्या..