मालवण /-

लगतच्या चीके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर आज सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. मालवण पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा ह गेले महिनाभर बेपत्ता असलेल्या कुणकवळे टॅबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी (वय ६५) यांचा असल्याचा निष्पन्न झाले आहे.

साळेलला जाणाऱ्या एका ग्रामस्थाला आज सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती साळेलचे पोलीस पाटील रविंद्र गावडे यांना दिली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन पहाणी करून मालवण पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती कुणकवळे गावात मिळताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गेला महिनाभर बेपत्ता असलेल्या कुणकावळे टॅबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी यांचा हा मृतदेह असल्याचा प्रथमदर्शी अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र मृतदेह पूर्णत: कुजलेल्या स्थितीत होता. मृतदेहाच्या जवळपास सापडेलेले कपडे तसेच पोलीस तपासानंतर हा मृतदेह बेपत्ता जनार्दन घाडी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी डी. व्ही. जानकर, श्री. वेगुर्लेकर, श्री. परम यांनी येऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतता जनाईन घाडी यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे असा परीवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page