वेंगुर्ला /-

 शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी बुडणाऱ्या एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले.आज ३१ मे रोजी सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील एक युवक समुद्रात उतरुन आंघोळ करीत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर खोल पाण्यात वाहून गेला. त्वरित येथील सागरी जीव रक्षक संजय नार्वेकर यांनी प्रसंगावधान राखत त्याला पाण्यातून बाहेर काढले.दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील ६ पर्यटकांना सागरी जीव रक्षक संजय नार्वेकर तसेच सहकारी निलेश साळगांवकर, घाटवळ यांनी प्रसंगावधान राखून  पाण्यातून बाहेर काढले होते व त्यांचा जीव वाचविला होता.याबाबत जीव रक्षक यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page