सावंतवाडी /-

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वर झाराप-पत्रादेवी बायपास येथे मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे टायर फुटल्याने उभ्या असलेल्या डंपरला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागाहून येणाऱ्या डंपर चा चालक जागीच ठार झाला.ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडर वर चढला व मागील डंपरचा चालक कॅबिनित अडकून पडला.बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.परशुराम चिन्नी राठोड २४ रा. गुढीपूर कुडाळ मूळ राहणार विजापूर कर्नाटकअसे मृत चालकाचे नाव असून त्याला जेसीबीच्या सहाय्याने डंपर मागे खेचून गाडीतुन बाहेर काढण्यात आले.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांसह डंपर चालक-मालक उपस्थित असून सावंतवाडी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page