सिंधुदुर्गनगरी/-
येथील जिल्हा क्रीडा संकुलमधील जलतरण तलावाच्या स्वच्छतेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी आज अचानक भेट देऊन पहाणी केली.आहे मागील आठवड्यात जलतरण तलावाच्या अस्वच्छतेबाबत प्राप्त झालेल्या पालकांच्या तक्रारी आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत त्याक्षणी भेट देऊन तलावाची पहाणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर ठेकेदार आदित्य रामदुलास जैस्वाल यांना नोटीस बजावून जलतरण तलावाची स्वच्छता करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर आज पुन्हा अचानकपणे त्यांनी भेट देऊन स्वच्छतेबाबत पहाणी करुन आवश्यक त्या तेथील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.