कणकवली /-

आमदार वैभव नाईक ह्याना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून वैभव नाईक हे शिवसेनेचे नसून वैभव नाईक हे शिवसेनेचे व्यावसायिक लाभार्थी आहेत. एम एस एम ई च्या कणकवली औद्योगिक महोत्सवातत 7 कोटी 50 लाखांचे अर्थसहाय्य जिल्ह्यातील होतकरू नवउद्योजकांना वितरित करण्यात आले. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एम एस एम ई खात्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील उद्यमशील तरुणांना आर्थिक पाठबळ देत त्यांना उद्योजक बनविण्याच्या रचनात्मक कार्याचा आरंभ केला आहे. स्वतः 2 टर्म आमदार असलेल्या वैभव नाईक यांना एम एस एम इ चा अर्थच कळला नाहीय. हे केंद्रस्तरीय खाते असल्याने त्याचे नियोजन केंद्र सरकार करते. तुमचे महाबिघाडी राज्य सरकार नियोजन शून्य असल्याने आमदार वैभव नाईक बेताल वक्तव्ये करत आहेत. एम एस एम इ च्या औद्योगिक मेळाव्याकडे जनतेने पाठ फिरवली म्हणणारे वैभव नाईक हे संकुचित वृत्तीचे दळभद्री आमदार असल्याची टीकाही भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे. आज कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक स्वतः पोट ठेकेदाराच्या भूमिकेत असतात. आपल्या क्रशरवरील खडी, दुकानातील स्टील, सिमेंट जबरदस्ती ने विक्री करणे हा एकमेव उद्देश त्या मागे आहे. शिवसेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते उपाशी ठेऊन वैभव नाईक आणि त्यांचे बंधू यांची पोट ठेकेदारी जोरात सुरू आहे.

आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात गेल्या दोन आमदारकीच्या कालावधीत सत्ता असून पण एकही लाक्षणिक काम केले नाही फक्त स्वतःच्या नफ्यासाठी ताडपत्री विकणे आणि दुसऱ्याला टोमणे मारणे ही पंचवार्षिक योजना घेऊन त्यांनी काम केले आणि अपघाताने आणि मोदी लाटेत भाजपाची मते घेऊन विजय संपादन केला. केंद्रीय मंत्री राणेंवर कार्यकर्त्यांचा चा विश्वास राहिला नाही असे सांगणाऱ्या वैभव नाईक यांचे चुलत बंधू आज एका घरात राहून भारतीय जनता पार्टीचे काम करतात यावरून आमदार नाईक यांची विश्वासाहर्ताता समजते. कुडाळ मालवण मतदारसंघातील वैभव नाईक रुपी कंसमामाचा राजकीय वध येत्या विधानसभा निवडणुकीत श्रीकृष्ण रुपी निलेश राणे करणार आहेत.

कालच्या आमदार नाईक यांच्या पत्रकार परिषदेला एकही निष्ठा शिवसेना पदाधिकारी उपस्थित नव्हता.फिरता रंगमंच असलेले दोन कार्यकर्ते डावे उजवे दिसले यावरूनच शिवसैनिकांचा आमदारांवरील रोष समजतो. केंद्रीयमंत्री राणे आमचे नेते आहेत. त्यांची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांनी घेऊन त्यांना msme सारखे वजनदार खाते देऊन सन्मानित केले. त्यांनी संधी चे सोने करून ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम राबविले आणि तरुण पिढीला अनेक रोजगाराचे मार्ग दाखविले, भविष्यात जिल्ह्यात शेकडो तरुण ह्या संधी चा फायदा घेऊन उद्योजक बनले तर विकासआड चा डोमकावळा म्हणून आमदार वैभव नाईक मिरवणार का?

केंद्रीयमंत्री राणेंनी पद आणि जबाबदारी ने आपले काम अतिशय प्रामाणिक पणे पार पडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आता आमदार नाईकांनी सत्तेच्या माध्यमातून एखादी सर्कस तरी जिल्हावासीयांना दाखवावी. सरकारी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेल्या कृषी प्रदर्शनाचे क्रेडिट घेऊन फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदारांनी करू नये. या कृषी प्रदर्शनात ही टक्केवारीवर आमदार नाईक यांचा डोळा होता असेही कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page