कणकवली /-

दारुम माळवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी बिबट्याचे ८ लाख किंमतीचे कातडे मोटरसायकल वरुन घेऊन जात असताना दोघांना पकडले होते. संशयित आरोपी सुभाष विलास तावडे (वय २९, रा. ओझरम, ता. कणकवली), प्रकाश अण्णा देवळेकर (वय४३ रा. म्हाळुंगे, ता. देवगड) यांना कणकवली पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला वन्य प्राण्याची शिकार व अवयवांची बेकायदेशिर वाहतूक होणार असल्याची माहितीनुसार सापळा रचला होता. त्यात कासार्डे ते पडेल कॅन्टीन जाणारे रोडवर गाव दारूम येथून होंडा शाईन मोटार सायकल वरून १४ मे सायंकाळी ३ वाजता बिबटया या प्राण्याचे कातडे घेऊन जात असताना सुभाष विलास तावडे, प्रकाश अण्णा देवळेकर हे आढळून त्यांना काल ताब्यात पोलिसांनी घेतले, मुद्देमाल व गुन्ह्यात वापरली मोटरसायकल, मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदर गुन्ह्यात वनविभाग कणकवली यांना अधिक तपास कामांसाठी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page