You are currently viewing कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिला गोवा राज्याचा आविष्कार फाउंडेशनचा उत्कृष्ट बालक्रिडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित..

कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिला गोवा राज्याचा आविष्कार फाउंडेशनचा उत्कृष्ट बालक्रिडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित..

कुडाळ /-

पणजी येथील ब्रिगान्झा हॉल येथील आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर (इंडिया) यांच्या कृतज्ञता समारोह मध्ये कुडाळ येथील कुडाळ हायस्कूल कुडाळची विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिला गोवा राज्याचा आविष्कार फाउंडेशनचा उत्कृष्ट बालक्रिडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास भाजपचे गोवा विधानसभेचे आ. राजेश फलदेसाई, मुंबई येथील उद्योजक  सुनिल नारकर, आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील, आंतरराष्ट्रीय कौतींचे चित्रकार व शिल्पकार जय हरमलकर आणि आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष जय पवार उपस्थित होते.

क्रिडा क्षेत्रात शमिकाने स्विमिंग, स्नींग, कराटे, सायकलिंग अशा विविध प्रकारात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आविष्कार फाउंडेशनने दखल घेऊन गोवा शाखेच्या वतीने तिला हा पुरस्कार देण्यात आला.

अभिप्राय द्या..