.देवगड /

पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या पवनचक्की गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश फी आकारण्याबाबत देवगड जामसंडे नगरपंचायतीने घेतलेला ठराव रद्द करण्यात यावा. असे पत्र आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्षा (देवगड जामसंडे) यांना गुरुवार २८ एप्रिल रोजी पाठवले आहे.

या पत्रात त्यांनी लिहिले आहे, देवगड-जामसंडे नगरपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेले पवनचक्की गार्डन हे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून येणा पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे. त्यामुळे पवनचक्की गार्डन पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये पर्यटकांवर १० रू. प्रवेश शुल्क आकारण्याचा ठराव करण्यात आला असल्याचे समजते.

सदरहू ठरावाची अमंलबजावणी झाल्यास पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होवू शकते. त्याचा परिणाम शहराच्या अर्थ कारणांवर होवू शकतो. सबब पवनचक्की गार्डन पाहण्यासाठीचा प्रवेश शुल्क आकारणीचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page