You are currently viewing अखेर लेखी आश्वासनानंतर केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी आपले जाहीर उपोषण घेतले मागे.

अखेर लेखी आश्वासनानंतर केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी आपले जाहीर उपोषण घेतले मागे.

ओरोस /-

तर पत्रकार आबा खवणेकर यांनी पुकारलेल्या जाहीर उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठिंबा देत तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी आणून,लेखी आश्वासन द्यायला भाग पाडले.त्यानंतरचं तब्बल ५ तासांनी उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी आपले जाहीर उपोषण मागे घेतले.यावेळी राष्ट्रवादीचे श्री.सामंत यांनी श्री.खवणेकर यांना लिंबू सरबत देऊन हे उपोषण मागे घेण्यास विनंती केली.तर यावेळी काॅग्रेसचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विधाता सावंत उपस्थित होते.

सिंधूदुर्गनगरी:-केळूस-कालवीबंदर येथील श्री.देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी १२ जुलै २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचून गेली. ही मोरी पूर्णपणे खचून गेल्याने धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवी बंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. वारंवार संबधित सर्व खात्यांकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेतल्याने केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्यावर तळी–बोवलेवाडी जवळ असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान लगत असलेली संरक्षिक भिंत १२ जुलै २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळून पडली आहे. सदर रस्ता कालवीबंदर समुद्र किनाऱ्यावर जात असल्याने मोठया प्रमाणात माणसांची ये-जा असून, मोरी खचल्यामुळे पुढे पडणाऱ्या वादळी पावसात कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटू शकतो तसेच कालवीबंदर येथे मच्छीमार वस्ती मोठया प्रमाणात आहे. सदर रस्त्यावरुन वेंगुर्ले व कुडाळ वरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठया प्रमाणात आहे.तसेच रिक्षा व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. तर प्रवाशांना व शेतकरी वर्गालाही त्याचा त्रास होत आहे. तसेच पावसाळय़ाच्या कालावधीमध्ये सदर मोरीवर पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने व वाहतुकीला एकच मार्ग आहे. तसेच सध्या या ठिकाणी मोरी जवळील रस्ताही खचत चाललेला आहे. याबाबत २१ जुलै २०२० रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा परीषद अध्‍यक्ष सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता जिल्हा परीषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग वेंगुर्ले, बांधकाम सभापती सिंधुदुर्ग यांना याबाबत निवेदने देण्यात आली होती. तर याबाबत वृत्तपत्रात व सोशल मिडीयावर सुध्दा आवाज उठविण्यात आला होता. यावेळी तातडीने जिल्हा परीषद अध्यक्षा समीधा नाईक यांनी येवून प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी बांधकाम खात्याचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते. कुठल्याहि परीस्थितीत २०२१ मध्ये याठिकाणी रस्त्यावरील पुल (मोरी) व संरक्षण भिंत  बांधण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र दीड वर्षे झाले तरी या ठिकाणी शासकीय स्तरावरुन कोणत्याही हालचाली अजून पर्यंत केल्या नसल्याने येत्या पावसाळय़ाच्या कालावधीमध्ये सदर मोरी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच केळूस कालवीबंदर हा रस्ता जिल्हा परीषद, सिंधुदुर्गच्या मालकीचा आहे. असे असताना याबाबत आजपर्यत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने २२ एप्रिल २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर यांनी उपोषण केले.

अखेर लेखी आश्वासनानंतर उपसरपंच आबा खवणेकर यांनी उपोषण घेतले मागे:-

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व बांधकाम विभागाचे लक्ष्मण परूळेकर,यांनी उपोषणस्थळी भेट देत पावसाळ्यापूर्वी या मोरीची दुरुस्ती करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,काॅग्रेसचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विधाता सावंत,राष्ट्रवादीचे बाळ कनियाळकर,निवृत्त पोलिस श्री. रमेश राणे,भास्कर परब आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..