You are currently viewing हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती.

हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती.

कुडाळ. /-

हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंग गायकवाड यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली. मराठा समाजासाठी योगदान आणि केलेले काम लक्षात घेतात त्यांना ही संधी देण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा आणि ध्येयधोरणे सर्वांपर्यंत पोहोचावी, अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा