You are currently viewing १ मे पासून कोकणकन्या,मांडवी, जनशताब्दी,नेत्रावती एक्प्रसेससह एकूण १० गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार..

१ मे पासून कोकणकन्या,मांडवी, जनशताब्दी,नेत्रावती एक्प्रसेससह एकूण १० गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार..

मुंबई /-

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी सुखद बातमी आहे.कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर, आता पहिल्या टप्प्यात येत्या १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा आणि मंगला एक्प्रसेससह एकूण दहा गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार आहेत.त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वेगवान होणार आहे.येत्या १ मेपासून पहिल्या टप्प्यात दहा गाड्यांना विजेवरील इंजिनाच्या सहाय्याने चालविले जाणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेगात वाढ होणार आहे; तसेच प्रदूषणातूनही सुटका होणार असून डिझेल पोटीच्या खर्चामुळे वार्षिक दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा