You are currently viewing अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केल्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी..

अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केल्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी..

ओरोस /-

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भीती दाखवून अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शारीरिक सबंध ठेवल्या प्रकरणी संशयित आरोपी सोमनाथ उर्फ नाथा दत्तात्रय वेंगुर्लेकर (५५) याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.
माहे एप्रिल २०२१ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत वेंगुर्ला तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला भीती दाखवून संशयित सोमनाथ याने अश्लील चाळे केले होते. तसेच तिच्याशी जबरदस्ती शारीरिक सबंध ठेवले होते. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात १९ एप्रिल २०२२ रोजी सोमनाथ वेंगुर्लेकर याच्या विरोधात भादवी कलम ३५४, ३५४ अ (१)(i), ३५४ अ (१)(ii), ३५४ अ (१)(iv), ५०६, ५०९, ३७६, ३७६ (१), ३७६ (२)(n), ३७६ (२)(i), ३७६ (२)(f) सह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी अटक ही करण्यात आली होती. संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

अभिप्राय द्या..