You are currently viewing कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी यांचे नंदुरबार येथे अपघात मृत्युमुखी.;पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी गेले होते नाशिक मध्ये..

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी यांचे नंदुरबार येथे अपघात मृत्युमुखी.;पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी गेले होते नाशिक मध्ये..

कुडाळ /-

मुळ नंदुरबार येथील व सध्या कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व उपनिरीक्षक पदाची परिक्षा देण्यासाठी नाशीक येथे गेलेले दिनकर जेमा पाडवी आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते आज ते व त्यांची बायको मोटारसायकल ने बाजारात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.दिनकर जेमा पाडवी पोलिस काॅस्टेबल बक्कल नंबर ५६६ हे कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते ,ते दिनांक १५-४-२०२२ पासून १९-४-२०२२ पर्यंत सलग सुट्टीवर गेले होते ही सुट्टी त्यांनी नाशिक येथे उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्याकरीता घेतली होती.परीक्षा देऊन ते आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते.काल रात्री ते आणि त्यांची बायको मोटारसायकल ने जात असताना वाटेत अपघाता होऊन ते जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

अभिप्राय द्या..