You are currently viewing “अरेरे” काय हे ? दारूच्या गुन्ह्यात आरोपीचे नाव नमूद नाही आणि दाखल केला दारूचा “वारस” गुन्हा;जिल्हापोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज..!

“अरेरे” काय हे ? दारूच्या गुन्ह्यात आरोपीचे नाव नमूद नाही आणि दाखल केला दारूचा “वारस” गुन्हा;जिल्हापोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज..!

कुडाळ /-

जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनच्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी 25 हजार रुपयांच्या केलेल्या घोटाळ्या संदर्भातील लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल ची बातमी अखेर खरी ठरली आहे.कुडाळ शहरात बेवारस स्थितीत सापडलेल्या दारू साठ्याचा गुन्हा मंगळवारी कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला,तो चुकीचा आहे.आरोपी हजर नसताना कायद्याने 65 (ई) प्रमाणे वारस गुन्हा दाखल करता येत नाही.या बेकायदेशीरपणे केलेल्या कुडाळ पोलिसांच्या कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा परिसरातील सामान्य नागरिकांना आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात कुडाळ येथील गुलमोहर हॉटेलच्या बाजुला श्रीकांत सरमळकर यांच्या जागेमध्ये दि. 12 डिसेंबर 2021 रोजी बेवारस स्थितीत सापडलेल्या दारू साठ्याबाबतची माहिती कुडाळ पोलिसांना देऊन तेथील केअरटेकर यांनी सदर दारु साठा पकडून दिला होता. त्यानंतर जवळपास चार महिन्यानंतर ही घटना लोकसंवाद लाईव्ह चॅनेलच्या निदर्शनास आल्यावर त्याबाबतची बातमी 16 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झाली होती.

सुरुवातीला सदर बेवारस दारू साठा प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्याच्या डायरीत अनक्लेम गुन्हा 13 डिसेंबर 2021 रोजी दाखल केला नसल्यामुळे
लोकसंवाद लाईव्ह ने बातमी प्रसिद्ध करून माहितीच्या अधिकारात माहिती मागणीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर कुडाळ पोलिस ठाण्याच्या त्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी दि. 19 एप्रिल 2022 रोजी अद्यापही आरोपी निष्पन्न झाला नसताना 65 (ई) प्रमाणे वारस गुन्हा दाखल करुन फार मोठी चूक केली आहे. जर 13 डिसेंबर रोजी बेवारस गुन्हाची नोंद पोलिस डायरीत केली असती तर 19 एप्रिल रोजी वारस गुन्हा दाखल करायची गरज नव्हती.आतापर्यंत या बेवारस दारु प्रकरणात आरोपी निष्पन्न नसताना सुध्दा 65 (ई) प्रमाणे वारस गुन्हा दाखल करुन कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक यांनी 25 हजार रुपयांचा घोटाळा केला असल्याचे स्वतःहून उघड करुन दिले आहे.याप्रकरणी आता मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब स्वतः लक्ष देऊन संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई करतील असा विश्र्वास सामान्य जनतेला आहे.

अभिप्राय द्या..