You are currently viewing कुडाळ शहरात बेवारस सापडलेल्या ‘त्या ‘दारूची पोलिस अधीक्षकांकडून चौकाशी व्हावी.;अभय शिरसाट.

कुडाळ शहरात बेवारस सापडलेल्या ‘त्या ‘दारूची पोलिस अधीक्षकांकडून चौकाशी व्हावी.;अभय शिरसाट.

कुडाळ /-

जिल्ह्यात कुडाळ शहरातील एका बेवारस स्थितीत सापडलेल्या दारूसाठ्याचा कुडाळ पोलिस ठाण्यात तब्बल चार महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात येतो. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. याबाबत सदर कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्याकडे करणार असल्याची माहिती कुडाळ काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिली.

ते म्हणतात, सामान्य व्यक्ती संबंधी एखादा गुन्हा असला आणि तोच गुन्हा दोन्ही बाजूकडून समेट करायचा झाल्यास पोलीस समेट करायला देत नाहीत आणि आता एक लाख रुपयाची दारू पोलिसांनी खाल्ली ते उघडकीस आल्यानंतर चार महिन्यांनी गुन्हा दाखल होत आहे, हे पुर्ण चुकीचे आहे.या प्रकरणात कुडाळ पोलिस ठाण्याच्या सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी गृहराज्यमंत्री श्री. पाटील आणि पोलिस अधीक्षक डॉ. दाभाडे यांच्या कडे करणार असल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..