You are currently viewing कुडाळ शहरातील येथील मामी माळगावकर यांचे ९५ व्या वर्षी झाले निधन.

कुडाळ शहरातील येथील मामी माळगावकर यांचे ९५ व्या वर्षी झाले निधन.

कुडाळ /-

मुळ खानोली व कुडाळ येथे वास्तव्यास आसलेल्या श्रीमती स्नेहलता (मामी) महादेव माळगावकर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी रविवारी सायंकाळी कुडाळ येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. कुडाळ गांधीचौक येथील काजू कोकम व्यापारी अशोक माळगांवकर यांची ती आई होत. सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष कै. एकनाथ ठाकूर यांच्या त्या जेष्ठ बहिण होय.

कुडाळ गांधीचौक येथे निलमगेस्ट हाऊस ही खानावळ त्या आपल्या मुलांसह चालवित होत्या. अडलेल्यांना मदत त्या नेहमीच करीत. सामाजिक जाणिव त्यांना असल्याने अनेक कुंटूबांना त्या मदतीचा हात देत असत. कै. ऊल्हास, कै. सुभाष, अशोक, शोभा अनिल तेडोंलकर, मंगल देवदत्त परुळेकर यांची ती आई होत. पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना, पणतवंडे, भाचे भाच्या व अन्य मोठा परीवार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या त्या आत्या होत. कुडाळ येथील व्यापारी योगेश माळगांवकर, संदेश माळगांवकर, मधुरा माळगांवकर यांची ती आजी होत. सायंकाळी कुडाळ येथील स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकिय शैक्षणिक, व्यापार क्षेत्रातले मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले.

अभिप्राय द्या..