You are currently viewing वेर्ले मध्ये रक्त दान शिबिरात २३ रक्तदाते यांनी केले रक्त दान.

वेर्ले मध्ये रक्त दान शिबिरात २३ रक्तदाते यांनी केले रक्त दान.

सावंतवाडी /-

रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान चळवळ गावागावांत रुजविण्यासाठी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान प्रयत्नशील असून सिंधुदुर्ग वासियाशी यासाठी सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात जिल्ह्यातील एकही रुग्ण रक्ताअभावी दगावणार नाही. अशे आवाहन
पु.प्रा. शाळा वेर्ले नंबर २ च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने अमृत महोत्सव समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी केले तर जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी रक्तदान व अवयव दान बाबतीत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर , जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा बँक संचालक व माजी सभापती रवींद्र मडगांवकर, माजी जि.प. सदस्य पंढरी राऊळ, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष सुनील राऊळ,तालुका उपाध्यक्ष दिपक तारी, तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र तावडे, महेश रेमुळकर, तालुका सचिव बाबली गवंडे,तालुका खजिनदार पराडकर , सिंधु रक्त प्रतिष्ठान जिल्हा सल्लागार माजी पोलीस अधिकारी गवस, वेंगुर्ले कार्यकारण सदस्या सम्रुदी पिळणकर, सावंतवाडी दोडामार्ग विभागिय अध्यक्ष संजय पिळणकर, अमृत महोत्सव समितीचे विष्णू राऊळ, उपाध्यक्ष प्रसाद गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश गावडे, सदस्य जानदेव लिंगवत, सल्लागार सुभाष राऊळ, साबा राऊळ,सल्लागार शिवराम राऊळ,प्रकाश मर्गज, रामा मर्गज, पडवे लाईफ टाईम हाँस्पिटलचे डॉ.प्रियांका कुडाळकर, सुमित मुकिदम, संतोष जाधव,पोलीस पाटील अरुण लिंगवत, सौ.सावंत, श्रीराम जड्ये , ग्रामपंचायत सदस्य रामु मेस्त्री, ज्ञानेश्वर राउंड, रवींद्र मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजीव लिंगवत, प्रसाद गावडे, रवींद्र मडगांवकर, जानदेव लिंगवत, रामु मेस्त्री, अमित गावडे, प्रकाश मर्गज, उदय मेस्त्री, जानदेव लिंगवत, पंढरी राऊळ, मधुकर राऊळ आदी २३ रक्त दातांच्या रक्तदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जळवी गुरुजी तर स्वागत जानदेव लिंगवत, प्रसाद गावडे आभार प्रदर्शन सौ. जळवी यांनी केले.

अभिप्राय द्या..