वेंगुर्ले /-

तीन पत्ती जुगार खेळल्या प्रकरणी करमळगाळू येथे टाकलेल्या धाडीत सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलीसांना मिळालेल्या माहिती नुसार धाड टाकली असता तेथे काहीजण जुगाराचे साहित्य सोबत बाळगून तीन पत्ती जुगार खेळत असताना दिसून आले. त्यात अनिकेत देवदास गावडे (वय २४ , रा पिंगळी-मापसेकर तिठा), निसार आदम शेख (वय ५० रा. पिंगुळी-गोंधळवाडी), अभिमन्यू मधुकर गावडे (वय ३४, रा. वाडीवरावडे क्षेत्रफळवाडी), प्रवीण यशवंत गावडे (वय ४१, रा. पिंगुळी-म्हापसेकर तिठा), नितीन श्रीधर पाटकर (वय ३८, रा. पिंगळी) आणि राजन मंगेश वाळके (वय ४८, रा. पिंगुळी-म्हापसेकर तिठा) यांचा समावेश होता. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दोन मोटरसायकल मिळून सुमारे ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल सापडला तो जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोविंद वारंग यांचे मार्गदर्शनाखाली स.पो. फौ. व्ही एन नाईक, पो.हे. गोसावी, पो. हे. कॉ..एस. ए. डिसोजा, पो.हे. का. बी एस अंदुरलेकर, पो.हे. का. एस बी नाईक, चालक पो.हे.कॉ. गावडे, पो. ना. ऐ सी किनळेकर या पोलीस पथकाने ही कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.फौ.के आर नाईक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page