You are currently viewing कुडासे गावातील तिलारी पाटबंधारे विभागाच्या अर्धवट कारभाराबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत दिले अधीक्षक अभियंता यांना निवेदन..

कुडासे गावातील तिलारी पाटबंधारे विभागाच्या अर्धवट कारभाराबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत दिले अधीक्षक अभियंता यांना निवेदन..

दोडामार्ग /-

कुडासे गावातील तिलारी पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग यांना अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे पूर्ण करण्याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत निवेदन दिले असता त्यात तिलारी पाटबंधारे विभागामार्फत पोट कालवे बांधकाम सुरू असून मुख्य वित्रीकांची कामे देखील झाली असून ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत आणि अशा कामामुळे पाणी झिरपून जमीन नापीक झाली आहेत त्याच प्रमाणे संपूर्ण कामे देखील अर्धवट पध्दतीने झाल्याने अशी कामे पूर्ण करणे तसेच नदीवर बांधलेल्या कॉजवेच्या पाईपमध्ये साचलेला गाळ पावसाळ्या पूर्वी काढणे अशा अनेक मांडत पावसाळ्या पूर्वी याचे निरसन करण्याची मागणी केली असता जून पूर्वी करण्याचे आश्वासन अभियंता पाटबंधारे विभाग यांनी दिले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ,मनेरी सरपंच विशांत तळवडेकर, रामदास मेस्त्री,उपस्थित होते.

अभिप्राय द्या..