You are currently viewing ओसरगाव येथील कार-माेटरसायकल अपघातात कणकवलीतील युवक जागीच ठार

ओसरगाव येथील कार-माेटरसायकल अपघातात कणकवलीतील युवक जागीच ठार

कणकवली /-

मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव येथे कणकवली दिशेला येणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यावेळी त्या दुचाकीवरील प्रसन्ना उर्फ बाळ प्रकाश मलूष्टे. 42 रा. मारुतीआळी, कणकवली आणि सोबत असलेला अभिजीत अशोक आचरेकर (43)रा.मारुती आळी जखमी झाले.मात्र, या अपघातात प्रसन्ना याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला तर अभिजीत हा सुदैवाने बचावला. तसेच सदर चारचाकी गाडी धडक देवून पलायन करत असताना तिचा पाठलाग करत ओसरगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन धुरी यांनी अडवले.

दरम्यान, अपघाता नंतर लागताच जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्नालायात दाखल करण्यात आले. तर सदर घटनेची माहिती कळताच नगराध्यक्ष समीर नलावडे,नगरसेवक विराज भोसले,संजय कामतेकर,अण्णा कोदे,शिशिर परुळेकर,कन्हैया पारकर,बाबू गायकवाड,राजू गवाणकर,बंटी तहसीलदार, सुशील आळवे,संजय मालंडकर, सुशील पारकर,निखिल आचरेकर,अमोल पराष्ट्येकर यांच्यासह मित्र परिवाराने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, प्रसन्ना याच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहिणी असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..