You are currently viewing कोनाळ उपरोग्यअंतर्गत गावातील जबाबदार कुंटुबांना भेट वस्तु देत करण्यात आला सत्कार

कोनाळ उपरोग्यअंतर्गत गावातील जबाबदार कुंटुबांना भेट वस्तु देत करण्यात आला सत्कार

दोडामार्ग /-

कोनाळ उपआरोग्या अंतर्गत येणाऱ्या गावातील जबाबदार कुंटुबांना भेट वस्तु देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील जेग्रामस्थ आरोग्याच्याबाबतीत जागृत आहेत,अशा ग्रामस्थांचा सत्कार कोनाळ सरपंच पराशर सावंत, कोनाळ उपसरपंच प्रितम पोकळे,कोनाळ ग्रा.पं.सदस्य मनाली शेलार मोर्ल ग्रा.पं.सदस्या रिया सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोनाळ गावातील आशा स्वयंसेविकाना पुष्पगुच्छ देवुन गौरवण्यात आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी ममता गवस, आरोग्य सेविका आर.एस.शिरसागर,आरोग्य सेवक जे.बी.तुळसकर, आशा स्वंयवसेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..