You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्याकडून निषेध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्याकडून निषेध !

कणकवली /-


राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा
खासदार शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असून ,हा हल्ला पूर्वनियोजन करून केला असल्याचे दिसून येत आहे.या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक सदस्य निलेश गोवेकर यांनी जाहीर निषेध केला आहे.ते पुढे म्हणाले की ,हा हल्ला भ्याड असून या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हा वेगळाच आहे.काल न्यायालयाच्या निकालाचे संपकऱ्यानी स्वागत केले होते.गुलाल उधळला होता, मात्र नंतर न्यायालयीन प्रक्रियेत आपला पराभव झाला. या अपयशाचा आपण धनी आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला आणि एसटी कामगारांना समजू नये म्हणून या अपयशाला खासदार शरद पवार जबाबदार आहेत, म्हणून हा हल्ला विरोधकांनी मुद्दामहून घडवून आणला आहे.या हल्ल्यात सहभागी झालेल्या संपकरी कामगारांवर कडक गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतीक सदस्य श्री. निलेश गोवेकर यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

अभिप्राय द्या..