You are currently viewing राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामिण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांच्या गैरसोयीवर तात्काळ उपाययोजना करा.;मनसेची मागणी.

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामिण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांच्या गैरसोयीवर तात्काळ उपाययोजना करा.;मनसेची मागणी.

सिंधुदुर्ग /-

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामीण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांची प्रचंड गैरसोय होत असून मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने आज मनुष्याच्या शिष्टमंडळाने कुडाळ प्रांताधिकारी व महामार्ग उपअभियंता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (कलमठ ते झाराप) सुधारणा व रुंदीकरण उपक्रम जवळपास पूर्णत्वास आलेला असून देखील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी धुरीटेंबनगर,वेताळ बांबर्डे कर्ली नदी पूल परिसर,वाडी हुमरमाळा इत्यादी महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला जिल्हा ग्रामिण मार्ग जोडतो.मात्र सदर ग्रामिण मार्गाकडे ये जा करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सुधारणा उपक्रमाच्या अंदाजपत्रकात अंडरपास,सब वे आदि कोणतीही तरतूद केली नसल्याने सर्व सामान्य वाहन धारकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.अशावेळी वेळ व अंतर वाचवण्यासाठी दुभाजकावरून सोयीस्कर मार्ग अवलंबिताना मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे अपघात सदरच्या जंक्शन ठिकाणी झालेले झालेले आहेत. त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करता सदरच्या जंक्शन ठिकाणी वाहनधारक,शेतकऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने योग्य पर्याय उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. सदरच्या जंक्शन ठिकाणापासून महामार्गावरील अंडरपास पूल/ब्रिज ही ठिकाणे जवळपास एक किलोमीटरच्या आसपास असल्याने दुभाजकावरून जाण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग नसल्याने वाहनधारक/शेतकरी जोखीम पत्करून दैनंदिन प्रवास करताना दिसून येतात.प्राप्त परिस्थिती लक्षात घेता कुडाळ तालुक्यातील पिंगुळी धुरीटेंबनगर,वेताळ बांबर्डे कर्ली नदी पूल परिसर,वाडी हुमरमाळा आदि ठिकाणी अंडरपास सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी किंवा रम्ब्लर स्पीड ब्रेकर लावून महामार्ग ओलांडून जाण्यासाठी अधिकृत उपाययोजना करावी अशी मनसेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यायाधी यासंदर्भात अनेक वेळा आंदोलनांच्या द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले असता ठेकेदार कंपनीस सूचना दिल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले आहे मात्र परिस्थिती जैसे थेच असून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होताना दिसून येत असून देखील प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याने मनसेने या संदर्भात तात्काळ उपाययोजना न केल्यास
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी मनसे तीव्र आंदोलनांची भूमिका हाती घेईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे,पिंगुळी विभाग अध्यक्ष सुंदर गावडे,शाखाध्यक्ष वैभव धुरी,विशाल धुरी,नागेश धुरी,रुपेश धुरी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..